Sukh Kalale

Sukh Kalale

Ajay-Atul & Shreya Ghoshal

Длительность: 5:40
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

करून अर्पण तुला समर्पण
घरात घरपण मी आज पहिले मी पहिले
रुणानुबंधात गीत गंधात
मी आनंदात आज गाईले मी गाईले
दिस वाटे वेगळी अन लागे का लळा
हे वेडे मन माझे पुरतेच भाळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सुर जुळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सुर जुळले मन जुळले
अंतरंगाने देह अंगाने स्पर्श केला
अन वाटे स्वर्गचं आला हाताला
स्वप्न जे होते पूर्ण ते झाले
मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
वचनांचे अर्थ मी, बंधन हे सार्थ मी
अर्धांगिनी समजून संपूर्ण पाळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सुर जुळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सुर जुळले मन जुळले
ओ प्रार्थना होती सात जन्मांची
भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
पूर्णता झाली सोनपायाने
आज सौभाग्ये क्षण आले माझ्या वाट्याला
जन्मांचे बंध हे प्रीतीचे गंध हे
तू एका गजराने केसात माळले
सुख कळले कळले सुख कळले कळले
कळले ना कसे असे सुर जुळले
सुर जुळले मन जुळले