Shri Swami Samarth

Shri Swami Samarth

Ajit Kadkade

Длительность: 3:12
Год: 2003
Скачать MP3

Текст песни

जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी
जगदुध्दारासाठी जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी तू एक होसी
म्हणूनी शरण आलो म्हणूनी शरण आलो
तुझे चरणांसी
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार तुझा अवतार
त्याची काय वर्णू
त्याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार नलगे त्या पार
तेथे जडमूढ कैसा तेथे जडमूढ कैसा
करु मी विस्तार
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
देवाधिदेवा तू स्वामीराया तू स्वामीराया
निर्जर मूनिजन ध्याती
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपुली ही काया
आपुली ही काया
शरणागता तारी
शरणागता तारी तू स्वामीराया
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले जडमूढ उध्दरीले
किर्ती ऐकुनी कानी
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले मज हे अनुभवले
तुझ्या सूता नलगे
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू आरती ओवाळू
चरणी ठेवूनिया माथा