Shatada Prem Karave
Arun Date
6:00भातुकलीच्या खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राजा वदला मला समजली शब्दावाचुन भाषा राजा वदला मला समजली शब्दावाचुन भाषा माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा का राणीच्या डोळा तेव्हा दाटुनि आले पाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा दुज्या गावचा वारा पण राजाला उपण राजाला शिरा कळली गूढ अटळ ही वाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे या प्रश्नाला उत्तर नव्हते या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना गीत तिचे गाताना वाऱ्यावरती विरून गेली वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी