Baglyanchi Maalphule

Baglyanchi Maalphule

Dr. Vasantrao Deshpande

Длительность: 6:32
Год: 1970
Скачать MP3

Текст песни

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

छेडीती पानांत बीन  थेंब  थेंब  पावसाचे
पावसाचे छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

त्या गाठी त्या गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी
नारळीच्या खाली त्या गाठी त्या गोष्टी
नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
भर दिवसा झाली रिमझिमते
अमृत ते विकल अंतरात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
गुंफताना हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात

तू गेलीस तोडूनी ती तू गेलीस तोडूनी
ती माळ सर्व धागे तू गेलीस तोडूनी ती
माळ सर्व धागे फडफडणे पंखाचे
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात