Neet Paha

Neet Paha

Jasraj Joshi

Альбом: Sangeet Manapmaan
Длительность: 3:57
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

मखमली गालिचावरून
पावले जरा जपून
भिंतीवरी चित्र पहा
शोभिवंत वस्तू अहा
बघ जरा गवांक्षातून
रम्य भोवती उपवन
खर्चूनी धनराशी मोठी
जमविले तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
होशिल राणी विलासिनी भामिनी
नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी भामिनी भामिनी
मी उतरवला स्वर्गच भुवनी भामिनी
नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी भामिनी
उतरवला स्वर्गच भुवनी भामिनी
नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी

रत्नजडित मंचक हा
ते झुंबर दीप पहा
शोभेची ही शस्त्रे
रेशमी तलम वस्त्रे
रत्नहार बाजूबंद
कंगण नथ मकरबंध
ही सारी धनराशी
सेवेला दासदासी
अन होशील तूच स्वामिनी भामिनी
नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी भामिनी

तिथे सजवल्यात अता
जगभरच्या पुष्पलता
जरी गंध नाही त्यांस
दरवळे अत्तर सुवास
त्या सुवर्ण पिंजऱ्यात
किती विहंग गीत गात
सजली जणू इंद्रसभा
शुभ्र अश्व रथ ही उभा
होशील मम अर्धांगिनी भामिनी

नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी भामिनी
उतरवला स्वर्गच भुवनी भामिनी
नीट पहा नीट पहा
नीट पहा जरा भामिनी भामिनी भामिनी