Labaad Landaga Dhong Karatay

Labaad Landaga Dhong Karatay

Jaywant Kulkarni

Альбом: Ekta Jeev Sadashiv
Длительность: 3:32
Год: 1972
Скачать MP3

Текст песни

असच व्हतं एक जंगाल जंगाल हम्म
त्या जंगलात झालं मंगाल मंगाल हम्म
वाघ आलं सिंव्ह आलं हत्ती आलं
घोडं आलं
वाघ आलं सिंव्ह आलं हत्ती आलं
घोडं आलं उट आलं माकड आलं
खोकड आलं बोकड आलं
अबबबब

लबाड लांडग ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय
लगीन करायच सॉंग करतय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय

लांडगा नवरा नी शेळी नवरी
डोईवर बाशिंग ठरना
डोईवर बाशिंग ठरना
आणि नवरीला लुगडं पुरना
ये हे हे ये हे हे ये हे हे
सासूचा शालू सासऱ्याचा पटका
सासूचा शालू सासऱ्याचा पटका
ठिगाळ जोडून लांब करतंय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय

तांदूळ वाटतोय ससा
करवली हरनी म्हणती बसा जी
हरनी म्हणती बसा नी
ढोबळ अस्वाल म्हणतंय हसा जी
ये हे हे ये हे हे ये हे हे
वाघाचा ताशा सिंव्हाचं ढोलकं
वाघाचा ताशा सिंव्हाचं ढोलकं
पिपाणी संग ढाम करतंय
कस ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय

घटका भरली तिथं तरी बी
भटजी मिळना कुठं हो
भटजी मिळना कुठं
आगावू गाढवं ताड्कन उठ हो
टिपत गातं मंतार म्हणतं
टिपत गातं मंतार म्हणतं
भोकाडं पसरून व्हॉव करतंय
ढाँग करतय
लबाड लांडग ढाँग करतय

मांडाव झाला वसाड सारा
पळत सुटलं व्हराड हा हा हा
पळत सुटलं व्हराड
लांडगा शेळीचा करतोय फराळ
माणूस काय बोला बोला
अन्‌ गाढाव काय
माणूस काय
अन्‌ गाढाव काय
जाईल तकडं भोंग करतय
कस ढाँग करतय