Pari Kathetil Rajkumara

Pari Kathetil Rajkumara

Krishna Kalle

Длительность: 6:25
Год: 1966
Скачать MP3

Текст песни

परीकथेंतिल राजकुमारा

परीकथेंतिल राजकुमारा
स्वप्नीं माझ्या येशिल का
परीकथेंतिल राजकुमारा
स्वप्नीं माझ्या येशिल का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा

ला ला ल ल ला ला ला

या डोळ्यांचे गूढ इशारे
या डोळ्यांचे गूढ इशारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
या डोळ्यांचे गूढ इशारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
राणी अपुली' मला म्हणोनी
राणी अपुली' मला म्हणोनी
तुझियासंगे नेशिल का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा

मूर्त मनोरम मनीं रेखिली
दिवसा रात्रीं नित्य देखिली

मूर्त मनोरम मनीं रेखिली
दिवसा रात्रीं नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जिवाला
त्या रूपाची साक्ष जिवाला
प्रत्यक्षांतुन देशिल का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा

ला ला ल ल ला ला ला

लाजुन डोळे लवविन खाली
लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गालीं येइल लाली
लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गालीं येइल लाली
फुलापरी ही तनू कांपरी
फुलापरी ही तनू कांपरी
हृदयापाशीं घेशील का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा

लाजबावरी मिटुन पापणी

लाजबावरी मिटुन पापणी
साठवीन ते चित्र लोचनीं
नवरंगी त्या चित्रामधले
नवरंगी त्या चित्रामधले
स्वप्नच माझे होशील का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा
स्वप्नीं माझ्या येशिल का
भाव दाटले मनीं अनामिक
साद तयांना देशिल का
परीकथेंतिल राजकुमारा