Pasaydaan

Pasaydaan

Lata Mangeshkar

Длительность: 3:58
Год: 1982
Скачать MP3

Текст песни

आतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे पसायदान हे
जे खळांचि व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात
वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूता
चला कल्पतरूंचे आरव चेतनाचिंतामणींचे गाव
बोलती जे अर्णव पीयूषांचे
चन्द्रमेंजे अलांछन मार्तण्ड जे तापहीन
ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनि तिहीं लोकी
भजिजो आदिपुरुषीं अखण्डित
आणि ग्रंथोपजिवीये विशेषी लोकी इये
दृष्टादृष्टविजये होआवेजी
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला