Gaganiche Nandadeep Jalati

Gaganiche Nandadeep Jalati

R N Paradkar

Длительность: 3:17
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

गगनीचे नंदादीप जळती गगनीचे नंदादीप जळती
साठविण्या गुरुमूर्ती लोचनी साठविण्या गुरुमूर्ती लोचनी
भक्तगणही जमती  गगनीचे नंदादीप जळती
गगनीचे नंदादीप जळती

पंचप्राणांचे हे निरांजन भक्तीची ही वातही भिजवून
श्रद्धेचे ते स्‍नेह घालुनी श्रद्धेचे ते स्‍नेह घालुनी
उजळियल्या ज्योती गगनीचे नंदादीप जळती
गगनीचे नंदादीप जळती

असंख्य लोचन असंख्य ज्योती श्रद्धेची ही भव्य प्रचिती
त्या दीपांच्या दिव्य प्रकाशी
त्या दीपांच्या दिव्य प्रकाशी श्री सद्गुरू मूर्ती
गगनीचे नंदादीप जळती  गगनीचे नंदादीप जळती

शैलगमन यात्रेच्या स्मृतीदिनी नगर सुशोभित सुंदर करुनी
भाविक संत भक्त सुवासिनी
भाविक संत भक्त सुवासिनी आनंदा लुटती
गगनीचे नंदादीप जळती गगनीचे नंदादीप जळती
साठविण्या गुरुमूर्ती लोचनी साठविण्या गुरुमूर्ती लोचनी
भक्तगणही जमती  गगनीचे नंदादीप जळती
गगनीचे नंदादीप जळती  गगनीचे नंदादीप जळती