Gelo Dattamayi Hovuni

Gelo Dattamayi Hovuni

R.N. Paradkar

Длительность: 3:17
Год: 2001
Скачать MP3

Текст песни

श्री दत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी
श्री दत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी

किती महीमा गावा गावा
चित्त आळवी एकच नावा
किती महीमा गावा गावा
चित्त आळवी एकच नावा
त्या नावातील सामर्थ्याने गेलो मी मोहुनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी

ब्रम्हा विष्णू महेश यांचे
रूप त्रिमूर्ती एकच साचे
ब्रम्हा विष्णू महेश यांचे
रूप त्रिमूर्ती एकच साचे
हृदय मंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहुनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी

चरण दोन हे मार्ग दाविती
सहा करे सामर्थ्य अर्पिती
चरण दोन हे मार्ग दाविती
सहा करे सामर्थ्य अर्पिती
ईशकृपेहून काय मागणे मागावे मागुनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी
श्री दत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रंदिनी
गेलो दत्तमयी होऊनी
गेलो दत्तमयी होऊनी