Ashi Hi Thatta

Ashi Hi Thatta

Shahir Sable & Partty

Длительность: 3:23
Год: 1967
Скачать MP3

Текст песни

बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेन हरवली बुद्धी
थट्टेन हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

थट्टा दुर्योधनानं हो केली
थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघाव मांडी फोडिली
अशी ही थट्टा  अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

थट्टेने दुर्योधन मेला
थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा  अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

थट्टा रावणाने त्या केली
थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा  बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

थट्टेतून सुटले चौघेजण
थट्टेतून सुटले चौघेजण
शुक भीष्म आणि हनुमान
शुक भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा  त्याला नाही बट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा

एका जनार्दन सर्वाला
एका जनार्दन सर्वाला
आहो थट्टेला भिऊन तुम्ही चाला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला  नरककुंडाला
अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा
भलभल्यास लाविल बट्टा अशी ही थट्टा