Shri Krishna Govind Hare Murari
Shailendra Bhartti
6:13उठा उठा सकल जन वाचे स्मरावा गजानन गौरी हराचा नंदन गजवदन गणपती उठा उठा सकल जन ध्यानि आणुनी सुखमूर्ती स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ उठा उठा सकल जन जो निजभक्तांचा दाता वंद्य सुरवरां समस्तां त्यासी ध्याता भवभय चिंता विघनवार्ता निवारी उठा उठा सकल जन तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर भावे विनवितो गिरीधर भक्त त्याचा होउनी उठा उठा सकल जन वाचे स्मरावा गजानन गौरी हराचा नंदन गजवदन गणपती उठा उठा सकल जन