Majhiya Priyala
Shivnath Gawde
1:29थोडी सागर निळाई थोडे शंख नी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट वार्यापावसाची गाज काळी भासतच दाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट