Sukh Ubhe Maziya Dari

Sukh Ubhe Maziya Dari

Shyama Chittar

Длительность: 3:14
Год: 1988
Скачать MP3

Текст песни

सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी
सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी
द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी
सुख उभे माझिया द्वारी

ती आठवते मज स्वयंवराची वेळा
ती आठवते मज स्वयंवराची वेळा
मी लिहिले होते प्रेमपत्र घननीळा
मी भाग्यवती मज हरीने नेले हरुनी
सुख उभे माझिया द्वारी
सुख उभे माझिया द्वारी

घालिते भुरळ ती वृन्दावनिची राधा
घालिते भुरळ ती वृन्दावनिची राधा
भामेस जाहली प्राजक्ताची बाधा
अभिषिक्त परी मी भगवंताच्या नयनी
सुख उभे माझिया द्वारी
सुख उभे माझिया द्वारी

सारथी संगरी महारथींचा श्याम
सारथी संगरी महारथींचा श्याम
मंदिरी माझिया प्रभुचा परि विश्राम
हर्षात हरवली यदुनाथांची राणी
सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी
द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी
सुख उभे माझिया द्वारी