Valivadh Na Khalnirdalan

Valivadh Na Khalnirdalan

Sudhir Phadke

Длительность: 6:16
Год: 1983
Скачать MP3

Текст песни

संमितरागावांचा सुग्रीव आज झाला अग्निसाथ सुग्रीवान असे घोषित केल्यावर
श्रीरामाने हि सुग्रीवाला सहाय्याचा वाचन दिल
सुग्रीवा ने वालीला  युद्धाचा आवाहन दिल
वाली आणि सुग्रीवा धवनद्ध मोठ्या निगराचंझाल
परंतु ऐनवेळी सुग्रीव पराजित होतोय असं पाहताच
श्रीरामाने एका वृक्षाच्या अडून एक बाण फेकला
आणि त्या बाणाने मृतप्राय होऊन वाली धरणी वर कोसळला
आपण श्रीरामांचा काहीही अपराध केला नसताना
त्यांचा बाणाने मृत्यू येतो आहे असा पाहताच तो कळवळून
श्रीरामांना म्हणाला रामा मी तुमच्या सन्मुख उभा नसताना
एका वृक्षाच्या आडून तुम्ही माला बाण मारलात
ह्यामध्ये काई पुरुषार्थ सादलात हा अधर्म तुम्ही का केला
आणि त्या वर प्रभू रामचंद्र उत्तर देतात सांगतायत
मी धर्माचें केलें पालन
मी धर्माचें केलें पालन
वालीवध ना खलनिर्दालन
वालीवध ना खलनिर्दालन
मी धर्माचें केलें पालन
अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजाजन
जैसा राजा तसे प्रजाजन

वालीवध ना खलनिर्दालन
शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्मे येते त्यास पुत्रता
शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्मे येते त्यास पुत्रता
तूं भ्रात्याची हरिली कांता
तूं भ्रात्याची हरिली कांता
मनीं गोपुनी हीन प्रलोभन
मनीं गोपुनी हीन प्रलोभन
वालीवध ना खलनिर्दालन
तूं तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
तूं तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधांचा
अंत असा हा विषयांधांचा
मरण पशूचें पारध हो‍उन
मरण पशूचें पारध हो‍उन
वालीवध ना खलनिर्दालन
मी धर्माचें केलें पालन
दिधलें होतें वचन सुग्रिवा
जीवहि देइन तुझिया जीवा
दिधलें होतें वचन सुग्रिवा
जीवहि देइन तुझिया जीवा
भावास्तव मी वधिलें भावा
भावास्तव मी वधिलें भावा
दिल्या वचाचें हें प्रतिपालन
दिल्या वचाचें हें प्रतिपालन
वालीवध ना खलनिर्दालन
नृपति खेळती वनिं मृगयेतें
नृपति खेळती वनिं मृगयेतें
लपुनि मारिती तीर पशूतें
दोष कासया त्या क्रीडेतें
दोष कासया त्या क्रीडेतें
शाखामृग तूं क्रूर पशूहुन
शाखामृग तूं क्रूर पशूहुन
वालीवध ना खलनिर्दालन
अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझें हें ही किष्किंधा
राज्य तुझें हें ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करीं समर्पण
सुग्रीवाच्या करीं समर्पण
वालीवध ना खलनिर्दालन
मी धर्माचें केलें पालन
वालीवध ना खलनिर्दालन
मी धर्माचें केलें पालन