Dev Gruhi Ya Bhakta Jana

Dev Gruhi Ya Bhakta Jana

Suman Kalyanpur

Альбом: Bhakti Suman
Длительность: 3:56
Год: 2010
Скачать MP3

Текст песни

देव गृही या भक्त जणांना गौरीनंदन पावला
देव गृही या भक्त जणांना गौरीनंदन पावला
सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला
(देव गृही या भक्त जणांना गौरीनंदन पावला)
(सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला)

महागणपती आज येतसे आमुच्या हृदयी, मंदिरी
मेधा, प्रज्ञा घेऊनी येई कांती सुवर्णा साजिरी

एकदंत हा विघ्ननाशना कर्षू घेऊनी धावला
सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला
(देव गृही या भक्त जणांना गौरीनंदन पावला)
(सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला)

सौभाग्याचे दान देतसे अमोघसिद्धी हासुनी
पावित्र्याचे श्रेष्ठ रूप हे नयनी राहे येऊनी

गणेशनंदन आज करीतसे मंगलमूर्ती शोभला
सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला
(देव गृही या भक्त जणांना गौरीनंदन पावला)
(सिद्धिविनायक शूर्पकर्ण हा चिंतामणी गं लाभला)

आरोग्याचा दाता गणपती शारदापती पाहिला
वाद कुशल त्या विनायकाला देवगणांनी पूजीला

सुमंगलाचा दायक विधी हा धरणीधर गं जाहला