Shiv Panchakshar Stotram By Suresh Wadkar
Suresh Wadkar
4:37लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं भाळा तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव देवीं दैत्य सागरमंथन पै केलें त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें तें त्वां असुरपणें प्राशन केलें नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी शतकोटीचें बीज वाचे उच्चारी रघुकुळटिळक रामदासा अंतरीं जय देव जय देव जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव