Aali Kuthunashi Kaani
Vasant Ajgaonkar
3:07हात दिला ग हाती हात दिला ग हाती अवचित भिजल्या श्रावण राती दोन पाखरे कळ्या फुलांशी दोन पाखरे कळ्या फुलांशी जोडून गेली नाती हात दिला ग हाती सुगंध स्वप्नील तुझ्या कुंतला त्यातून नकळत जीव गुंतला स्पर्शाच्या हर्षात गारवा तुझा नि माझा साथी हात दिला ग हाती करांत उरली केवळ थरथर स्वरांत धागे जुळले नवथर धुंद तराणे छेडीत लहरी दूर तरंगत जाती हात दिला ग हाती वाहत गेला झुळझुळ वारा स्मृतीत ठेवून मोरपिसारा प्राजक्ताचा बहर आटवून गंधीत झाली माती हात दिला ग हाती अवचित भिजल्या श्रावण राती दोन पाखरे कळ्या फुलांशी जोडून गेली नाती हात दिला ग हाती