Kaahi Bolayache Aahe

Kaahi Bolayache Aahe

Arun Daate

Длительность: 5:32
Год: 1994
Скачать MP3

Текст песни

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची...
पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग...
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास...
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने...
तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी
तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी...
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
पण बोलणार नाही, पण बोलणार नाही