Ganadhi Paho Utha Lavkari
Suman Kalyanpur
4:37दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो आला गं सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला-आला गं सुगंध मातीचा दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो आला गं सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला-आला गं सुगंध मातीचा श्रावणात सारे जीव झाले, बाई ओले ऊन हळदीचे पाना-पानांतुन खेळे श्रावणात सारे जीव झाले, बाई ओले ऊन हळदीचे पाना-पानांतुन खेळे, ओ उभी पिके ही डोलती, बाळे झाडांची बोलती आला गं सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला-आला गं सुगंध मातीचा वसुंधरा आज नवरसात बुडाली माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली वसुंधरा आज नवरसात बुडाली माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली, आकाशी उडाली श्रियाळ राजाचा सण चांगुणा मातेचा नागपंचमीचा देव तो गं शोभला, हो कुणी गौरी गं पूजिती, गोफ रेशमी विणती आला गं सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला-आला गं सुगंध मातीचा दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो आला गं सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती आला-आला गं सुगंध मातीचा आला-आला गं सुगंध मातीचा आला-आला गं सुगंध मातीचा