Palbhar Thamb Jara Re Vithu

Palbhar Thamb Jara Re Vithu

C Ramchandra

Альбом: Manoos Tujhe Naav
Длительность: 3:20
Год: 1965
Скачать MP3

Текст песни

आलो मी हितगूज कराया
आलो मी हितगूज कराया
जाउ नको रे विठू
पळभर थांब जरा रे विठू
पळभर थांब जरा रे विठू
विठू रे

असा येउनी भलत्या पारी
नको वाजवू पाऊल दारी
असा येउनी भलत्या पारी
नको वाजवू पाऊल दारी
मायपित्याच्या सेवेमधुनी सांग कसा रे उठू
विठू रे सांग कसा रे उठू
विठू रे थांब जरा रे विठू
विठू रे

कूस बदलुनी बाबा-आई
घेत विसावा अबोल होई
कूस बदलुनी बाबा-आई
घेत विसावा अबोल होई
पाय चेपिता दोघांच्या पापण्या लागु दे मिटू
विठू रे थांब जरा रे विठू
विठू रे थांब जरा रे विठू
विठू रे

करिसी का माझ्याशी कावा
करिसी का माझ्याशी कावा
तुझाच मी तू माझा रे
तुझाच मी तू माझा देवा
अंतर देऊ नको नको रे मन अपुले पालटू
विठू रे थांब जरा रे विठू
विठू रे थांब जरा रे विठू
विठू रे

आलो मी हितगूज कराया
जाउ नको रे विठू
पळभर थांब जरा रे विठू
पळभर थांब जरा रे विठू
पळभर थांब जरा रे विठू