Naam Tujhe Gheta Deva Hoi Samadhan
Prahlad Shinde
3:27गेला हरि कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घूमे ना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा रमती कुंजवणी बाला असावा तिथे नंदलाला कुणी जा आणा मुकुंदाला जीव हा वेडापिसा झाला हरिचा शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा कुणाशी केला जरी दंगा मला येऊन जणी सांगा त्यास दाखवीन मी इंगा नका पण लपवू श्रीरंगा माझा श्याम मला दावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा कधी ना झाली आजवरती गं नजरेआड कृष्णमूर्ती असता गोप सदा भोवती कशी मग पडली भूल पूर्ती हरिचा किती करू धावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा राधा घरात जर नाही कुणी जा संजयास पाही वडाखाली यमुनेडोही धरुनी आणा गे लवलाही त्याचा काढला कृष्णकावा उडतो डोळा, डोळा बाई डावा उडतो डोळा, डोळा बाई डावा गेला हरि कुण्या गावा? कुणाला नाही कसा ठावा? घूमे ना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा