Achyutam Keshavam
Sadhana Sargam
5:25जय देव जय देव, जय जय अवधूता (जय देव जय देव, जय जय अवधूता) अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता (अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता) जय देव जय देव (जय देव जय देव) तुमचे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शनमात्रेविलया जाती भवदुरिते चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते जय देव जय देव (जय देव जय देव) सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा शरणागत तुज होतां भय पडले काळा 'तुमचे दास करिती सेवा सोहळा जय देव जय देव (जय देव जय देव) मानवरुपी काया दिससी आम्हांस अक्कलकोटी केले यतिवेषे वास पूर्णब्रम्ह तूची अवतरला खास अज्ञानी जीवास विपरीत हा भास जय देव जय देव (जय देव जय देव) निर्गुण निर्विकार विश्वव्यापक स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक अनंत रुपे धरसी करणे ना एक तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख जय देव जय देव (जय देव जय देव) घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद-गुरुची भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी शरणागत दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय देव (जय देव जय देव) जय देव जय देव, जय जय अवधूता (जय देव जय देव, जय जय अवधूता) अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता (अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता) जय देव जय देव (जय देव जय देव) पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती (पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती) स्वामी करण्या तव आरती (स्वामी करण्या तव आरती) सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) हरी हर संगे ब्रम्हदेवहि, खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पुनव हासते प्रसन्नतेने, मुख चंद्राच्या वरी लाजवती रवि तेजाला तव, नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी स्वामी सदैव या ओठी श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जगजेठी अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती आहे, स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) धर्माचरण पावन व्हावे, सदा असो सन्मति स्वामी सदा असो सन्मति सत कर्मचा यज्ञ घडवा, झिजवुनि ही यष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती स्वामी घेऊनी मज हाती सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा अल्पचि भिक्षा घालुनी स्वामी, न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती (पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती) स्वामी करण्या तव आरती (स्वामी करण्या तव आरती) सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती) सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती (सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती)