Kase Sartil Saye
Sandeep Khare
4:21दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर निळेनिळे गारगार पावसाचे घरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा दूरवर रानभर नाचणारा निळा मोर दूरवर रानभर नाचणारा निळा मोर मोरपिस मखमल उतू गेले मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर शहार्याचे रान आले एका एका पानावर थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर शहार्याचे रान आले एका एका पानावर ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर उधळत गात गात पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळहुळ पावलांत उधळत गात गात पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळहुळ पावलांत असे नभ झरताना घरदार भरताना असे नभ झरताना घरदार भरताना आले जल गेले जल झाले जल आरपार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे जशी ओली हुरहुर थरारते रानभर जशी ओली हुरहुर थरारते रानभर तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर