Dhyaan Shlok - Maalaakamandaluradh, Traymurti Raja, Datta Gayatri, Jap
Sanjeev Abhyankar
24:31जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव तुमचे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते जय देव जय देव सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा शरणागत तुज होतां भय पडले काळा तुझेच दास करिती सेवा सोहळा जय देव जय देव मानवरुपी काया दिससी आम्हांस अक्कलकोटी केले यतिवेषे वास पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास अज्ञानी जीवास विपरीत भास जय देव जय देव र्निगुण र्निविकार विश्वव्यापक स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक अनंत रुपे धारसी करणे नाएक तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख जय देव जय देव घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद् गुरुची भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी शरणागत दासावर करी कृपा दृष्टी जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव