Sundara

Sundara

Sonali Sonawane, Rohit Raut, & Rohit Nagbhide

Альбом: Sundara
Длительность: 4:09
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा
मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा

नाकात नथनी कानात झुमका केसामधी गजरा
मराठमोळी नेसून साडी भारी तुझा नखरा

सुंदरा झालो तुझा फॅन मी खरा
सुंदरा स्वेंग तुझा लयी जबरा
सुंदरा प्रेमात तुझ्या लाख नजरा
सुंदरा

सुंदरा झालो गं तुझा फॅन मी खरा
सुंदरा स्वँग तुझा लयी जबरा
सुंदरा प्रेमात तुझ्या लाख नजरा
सुंदरा

झऱ्यावानी बोल तुझे नदीवानी चाल
आषाढाच्या ढगावानी काळे काळे बाल

झऱ्यावानी बोल तुझे नदीवानी चाल
आषाढाच्या ढगावानी काळे काळे बाल
जिंदगीत आलीस तू होऊनी बहार
उन्हामधी जसं गुलमोहराचं झाड
तुझ्याच भवती गरगर फिरतो बनून मी भवरा
तुझ्याविणा या मनात माझ्या इचार ना दुसरा

सुंदरा चालली उडवीत पदरा
सुंदरा नखरा तुझा लयी खतरा
सुंदरा निघाली कुठे थांब ना जरा
सुंदरा
सुंदरा झालो तुझा फॅन मी खरा
सुंदरा स्वेंग तुझा लयी जबरा
सुंदरा प्रेमात तुझ्या लाख नजरा
सुंदरा

सजनाच्यासाठी माझ्या करते मी साज
गालावर लाल लाल उसळते लाज
फिरतात माझ्या मागंपुढं इश्कबाज
लाखो दिलांवरी माझं रूप करी राज
खुळ्या माझ्या काकनांचा
जुळ्या माझ्या पैंजनाचा
सजनाच्या मनामधी घुमतोया नाद
माळीन गं बाई त्याच्या मिठीचा मी हार
लाडं लाडं तो गं माझे पुरवील लाड
अंगभर दरवळ नवतीचा भार
नजरेला चढतोया रूपाचा खुमार

नवसाची तू नवरी माझी मी गं तुझा नवरा
सप्तपदीच्या होमाभवती मारू सात चकरा

सुंदरा बांधुन शालू पदरा
सुंदरा नेईन तुजला मी घरा
सुंदरा आशिक तुझा मीच खरा
सुंदरा

सुंदरा चालली उडवीत पदरा
सुंदरा नखरा तुझा लयी खतरा
सुंदरा प्रेमात तुझ्या लाख नजरा
सुंदरा

सुंदरा चालली उडवीत पदरा
सुंदरा नखरा तुझा लयी खतरा
सुंदरा प्रेमात तुझ्या रंगलो पुरा
सुंदरा

सुंदरा झालो तुझा फॅन मी खरा
सुंदरा स्वेंग तुझा लयी जबरा
सुंदरा प्रेमात तुझ्या लाख नजरा
सुंदरा