Ram Janmala Ga Sakhi

Ram Janmala Ga Sakhi

Sudhir Phadke & G D Madgulkar

Длительность: 8:11
Год: 1960
Скачать MP3

Текст песни

प्रसदतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूचे अंश मानवी
धन्य दशरथ तुला लाभला देव पित्याचा मान
हे  यदनवृक्षाचे वाचन खरं ठरलं त्या पायसच्या
सेवनानं दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या
यथाकाळी त्या प्रसूत झाल्या कौशल्येला श्री राम
सुमित्रेला लक्ष्मण तसाच क्षत्रूघन आणि कैकयीला भरत
असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले राजाची इच्छा
पूर्ण झाली प्रसादातील सुखाला सीमाच राहिली नाही
नगर्जनाचा आनंद तर नुसता उजंडत होता श्रीरामधिक
भावंडं रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया
श्रीराम जन्माचा गीतच गात होत्या पुन्हा पुन्हा गात होत्या

चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणीसौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
काय काय करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला
उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला
युवतींचा संघ एक गात चालला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

वीणारव नूपुरांत पार लोपले पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनी नृत्यगायनी
सूर रंग ताल यात मग्‍न मेदिनी मेदिनी
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला