Deva Daya Tujhi
Suman Kalyanpur
3:17या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार आईस देव माना वंदा गुरूजनांना आईस देव माना वंदा गुरूजनांना जगि भावनेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा कुलशील छान राखा ठेवू नका विकार या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार