Aatach Amrutachi Barsun Raat Geli

Aatach Amrutachi Barsun Raat Geli

Suresh Wadkar

Альбом: Dubhangun Jata Jata
Длительность: 6:02
Год: 1984
Скачать MP3

Текст песни

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच हाय माझे जपता न भान आले
जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात  गेली
आताच अंग माझे
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे
उरले जरा जरासे गगनात मंद तारे
गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
आताच अंग माझे
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली

अजुनी सुगंध येई धुळीस मोगऱ्याचा
अजुनी सुगंध येई धुळीस मोगऱ्याचा
धुळीस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली
आताच अंग माझे
आताच अंग माझे विझवून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अमृताची बरसून रात गेली