The Warli Revolt (Feat. Prakash Bhoir)

The Warli Revolt (Feat. Prakash Bhoir)

Swadesi

Альбом: The Warli Revolt
Длительность: 5:02
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

मी तो वारली आदिवासी
आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक
ह्या रानाचा मूळ निवासी
जीव आणतो पडसर मातीत
प्राण हिरवा माझा देव आहे वाघोबा
प्रगती तुमच्या बाद आमच्या जंगलातनं माग व्हा
पैसा किती दाखवाल? भौतिक सुखाचे चाकर व्हाल भविष्य तुमचे हाय लबाड
मी जगतो हाय तो वर्तमान
प्रगतीचे तुमचे ढोंग
पहातर पैसे छापतंय कोण
झाडे आमची कापतंय कोण नि
जंगलात मेट्रो मागतंय कोण ?
झाले आहे जगणे दुःख हे
पिंजऱ्यात घालता जनावर मुके
केले मालमत्ताचे तुकडे
पाहुना देत तुम्हा आकाश मोकळे
गोडबोले नेता ते सोंगाडे, आदिवास्यांचे घर म्हणे झोपडे
चोंबडे तर लबाड बोंबले
स्वय खिशा मध्ये रोकडा कोंबले
सहू आम्ही का तुमची तुडवनी
पाहू तरी किती तुमची फसवणी
निशी दिनी आम्हा देता अशांती आत्ता ओढतो माती कपाळतटी
धरीन बाण मी होईन रानटी यातायात मग येईल क्रांती
भीत ना तुला मी तिलका मांझी हासी हासी चडवो फासी

माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
अरे माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं (अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं)
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं (अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं)

हमें ना पसंद ये खोटा विकास,
ना है तुम जैसे चोरों पे विश्वास मेट्रो बनाने उखाड़ो तुम झाड़ जब झाड़ ना बचेंगे कैसे लोगे सांस
घर मेरा जंगल खुला आकाश,
तुम आये त्रास देने करने इसका नाश प्रकृति का बनाओ मज़ाक यही प्रकृति से बनी मानव जात
तुम आज रहे हो हमे भगा, छिनके हमसे तुम हमारी जगह
बस बचा है ये जीने का तरीका, हम वो भी छिनके करने हमें तबाह
सज़ा पक्षी प्राणी की है क्या? क्यों इन्हे बेदखल कर रहे ऐसा?
उद्योगी सरकार हमें रहे फ़सा, हमें वटा के ये बना रहे पैसा
और बसा रहे भलती सोच,
भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हे दोष पर अफ़सोस वो ना देख सकेंगे वो,
सहते हुए अपने अगले पीढ़ी को
खुद तुम जीओ और जिनेदो, लगाओ पौदे जब तक जीवित हो
मूर्खो उठो अपनी सोच बदलो या ना कुछ बचेगा फिर खोनेको,
जीनेको एक ही हे प्राण उसकी भी कागज़
में तुम मांगो पहचान आदिवासी हु गरीब इंसान कैसे साबित करू मेरा है ये स्थान
मै किसान उगावु अनाज और हर प्राणी मेरे परिवार समान
खुद पे करो तुम बस एक एहसान बचालो अपनी ये सोने की खाण

गाव शेजारी पडीक रान, पिकवलं आदिवाश्यान गाव गुंड हरामखोरांन त्याची केली आदुळदान
जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं (अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं)
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं (अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं)

जंगली जंगली जंगली
जंगली जिंदगी पाहिजे आम्हाला जंगली खावाले जंगली पावर
मातीची लेकरं मायीशी जुळून दोस्त आणेवाले आहे जनावर
हुकुरुकुकु म्हटल्या बरोबर एका आवाजावर सारे अंगावर.
तुम्हाला तर लोक म्हणते मालक पाठी मागं किती गंदी हालत
मंत्री नंदी सारखे डोलत गुलाम बनून राजाचा थाट.
आदेश देते कि जंगलाला काप
लावला तर नय ये कोणाचा बाप
सिमेंट चे मजले टाकाले भोपळे
तरी भी पाहिजे छमिया नाच
या जंगलात, एकीने नाचतो धरून साऱ्यांचे हातात हात
तारपा ढोल वारली बोल वाजते नाचते या जंगलात
बायको पोरं hardcore बहीण भावा सारखा समाज
निसर्गाच्या रंगानं जगात femous आमचा वारली art
स्वतःच्या घरानं अन्न बनवतो नाही हो आम्ही कोणाचे गुलाम
गाड्या मोटार सवयी तुमच्या इंधनाची तुम्ही करा तबाही कारखाने देते झेहरीला धुआ
आणि तरंगते ढगांची काळी मलाई
बंदुका मारायला पैसा पण जनतेच्या भुकेचा इलाज केला नाय
इतिहास देते साक्ष वारली कधीभी भुकेनं मेला नाय

अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
अरे जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई

रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई

जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई

रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई

झाड तुम्ही तोडून टाकता त्याग आम्हा काय मागता
अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता
डोळ्यांदेखत उजेड चोरितां त्याग आम्हा काय मागता
त्याग आम्हा काय मागता
त्याग आम्हा काय मागता
अरे त्याग आम्हा काय मागता