Dhundit Gandhit Houni Sajna

Dhundit Gandhit Houni Sajna

Usha Mangeshkar

Длительность: 3:14
Год: 1969
Скачать MP3

Текст песни

धुंदित गंधित होवुनि सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
धुंदित गंधित होवुनि सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
छेडित ये प्रीत संगीत सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
ये सजणा

कुंजात या गंधलेली फुले
माळुनि जाई झुले हा
कुंजात या गंधलेली फुले
माळुनि जाई झुले हा
गंधात ही धुंद झाली चमेली
गुलमोहराला भुले हा हा हा हा
तुझी सखी तुझ्या सवे ही
धुंदित गंधित होवुनि सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
ये सजणा

पानांतुनी रेशमी चांदणे हे
मोहूनी येई करी हा
पानांतुनी रेशमी चांदणे हे
मोहूनी येई करी हा
गाण्यातले सूर हे अमृताचे
दाटुनी आले उरी हा हा हा हा
अशी घडी युगायुगाची
धुंदित गंधित होवुनि सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
छेडित ये प्रीत संगीत सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
ला ला ला ला ला ला ला ल ला