Madana Mana Mohini
B. Ajaneesh Loknath, Pramod Maravanthe, Vijay Prakash, And Ananya Bhat
3:41ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणिवांचा पूल कोणी सांधला ऐलतिरी पैल हाती लागला रंगली मेंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले ही वाट कुठली जागली दोघानटुनी जी चालली ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली धे ना ना रे ना प ध ध प म ग प ध ध प म ग प ध ध प ग रे नी सा नी सा रे रे प म गा म रे सा रे नी सा नी सा रे रे प म गा म रे सा रे नी सा माझे बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे-तुझे हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणिवांचा पूल कोणी सांधला ऐलतिरी पैल हाती लागला रंगली मेंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली सावली