Ganpati Aale (From "Gharat Ganpati")
Javed Ali
3:54जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात नजरेचा नखरा, नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी, सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची, नवसाची गौराई माझी बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची या लाजऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतूनी तू बोलता, न बोलता कळला अर्थ हा नवा आली घरी गिरीनंदिनी, लावू पंचारती या गौराईला पाना-फुलांनी सजवूया, गाऊया आरती आ, चमचम चांदणी, चंचल दामिनी लखलखते ज्याची ज्योत तू मणी सजली, रंगली, आस ही वेडावली आज स्वप्नापरी अवतरली लाडाची गौरी पहा आज माझी बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची (अवतरली लाडाची, नवसाची गौराई माझी) (बघ हसली मोहरली, नवसाची गौराई माझी) (नवसाची गौराई, नवसाची गौराई) (नवसाची गौराई माझी) (नवसाची गौराई, नवसाची गौराई) (नवसाची गौराई माझी)