Prem Swarup Aai
Lata Mangeshkar
3:26गंगा जमुना डोळयात उभ्या का गंगा जमुना डोळयात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा कडकडुनी तू मिठी मारता बाळे बालपण आले आले घुमवित घुंगुर वाळे आठवले सारे सारे गहिवरले डोळे आठवले सारे सारे गहिवरले डोळे कढ मायेचे तुला सांगती जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा दारात उभी राहिली खिलारी जोडी बघ दिर धाकले बसले खोळंबुन गाडी पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी पूस ग डोळे या पदराने सावर ही साडी रुप दर्पणी मला ठेवूनी जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा मोठ्याची तू सून पाटलीण मानाची हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीनचुडे बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे नकोस विसरु परि आईला जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा