Ethech Aani Ya Bandhavar
Manik Varma
3:22कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम एक एकतारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोडी धागा जोडी जानकीचा नाथ जानकीचा नाथ राजा घनश्याम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम दास रामनामी रंगे राम होइ दास एक एक धागा गुंते धागा गुंते रूप ये पटास रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम विणुन सर्व झाला शेला पूर्ण होइ काम ठायि ठायि शेल्यावरती शेल्यावरती दिसे रामनाम रामनाम रामनाम दिसे रामनाम गुप्त होई राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर पाहि जो कबीर विणूनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम