Vijay Pataka Shreeramachi

Vijay Pataka Shreeramachi

Manik Varma, Party

Длительность: 3:19
Год: 2001
Скачать MP3

Текст песни

विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी

विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी ओ प्रभू आले मंदिरी
गुलाल उधळून नगर रंगले भक्‍्तगणाचे धवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे
रामभक्तीचा गंध दरवळे
गुढ्यातोरणे घरोघरी ग घरोघरी
प्रभू आले मंदिरी आले प्रभू आले मंदिरी

आला राजा अयोध्येचा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी आरती ओवाळती'नारी
प्रभू आले मंदिरी आले प्रभू आले मंदिरी

आ आ श्रीरामाचा गजर होऊनी गजर होऊनी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्ती युगाची ललकारी ग  ललकारी
प्रभू आले मंदिरी आले प्रभू आले मंदिरी
विजय पताका श्रीरामाची श्रीरामाची
विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी ओ प्रभू आले मंदिरी