Var Dhagala Lagali Kal

Var Dhagala Lagali Kal

Manjari Banerjee

Длительность: 5:08
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

जसं जीवात जीव घुटमळ
तसं पिरतीच वाढतंय बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ
ह गण हे बघून दुश्मन जळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळ
ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळ
चल ग राणी गाऊया गाणी
फिरुया पाखरां संग
रामाच्या पारात
गार गार वार्यात
अंगाला भिडुदे अंग
जवा तुझ न माझं जुळं
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
कुठं हा घेऊन जावा
काय बाई अकरीत
झाल्या इपरीत
सस्याला वेळ कुणी द्यावा
माझ्या पदरात पडलंय खूळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

जमीन आपली उन्हानं तापली
लाल लाल झालिया माती
करूया काम अन गाळूया घाम
चला पिकवू माणिक मोती
एका वर्षात होईल तीळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

शिवार फुलतंय तोऱ्यात डुलतय
झोक्यात नाचतोय धोत्रा
तुरीच्या शेंगा दवतायत ठेंगा
लपलाय भुईमूंग भित्रा
मधी वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

झाडावर बुलबुल
बोलत्यात गुल गुल
वराडतियात कोकिळा
चिमणी झुरते उगीच राघू
मैने वरती खुळा
मोर लांडोरी संग खेळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

थुईथुई नाचते
खुशीत हस्ते
मनात फुलपाखरू
सोडा कि राया नाजूक काया
नका गुदगुदल्या करू
तू दमयंती मी नळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

बाह्मणाच्या मळ्यात
कमळाच्या तळ्यात
येशील का संध्याकाळी
जाऊ दुसरीकडं
नको बाबा तिकडं
बसलाय संतू माळी
म्हाताऱ्याला तर लागलाय चळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)

आलोया फार्मात पडलोया पिरमात
सांग मी दिसतोय कसा
सांगू अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा
तुझ्या वाचून जीव तळमळ
पाणी थेंब थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब थेंब गळ)