Bikat Vahivat Nasavi
Shahir Sable
6:20अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना