Sukh Kalale
Ajay-Atul & Shreya Ghoshal
5:40शहारली मावळ माती दिस किती गोड गं शहारली मावळ माती दिस किती गोड गं मोहरल्या मनाला या साजनाची ओढ गं डोळ्याच्या या पणतीनं दारापाशी ओवाळीनं मनभर न्याहाळीनं तेजवरा मन माझं स्वप्नातं हरवूनी निजलं हुरहुरलं रूणझुणलं वाट पाहे शंभूराया मन एकलं हुरहुरलं ग बाई बावरल वाट पाहे शंभूराया मन एकलं काजळल्या नभकडा उगवला चंद्र धुंदसा काजळल्या नभकडा उगवला चंद्र धुंदसा येशील अंगणात तू लागे आस राजसा मनरमणा सख्यासजना सजना मन माझं मोहुनी तुझ्यासाठी थिजलं हुरहुरलं रूणझुणलं वाट पाहे शंभूराया मन एकलं हुरहुरलं ग बाई बावरल वाट पाहे शंभूराया मन एकलं पाहूनिया रणवीरा श्रीराम भासले मला पाहूनिया रणवीरा श्रीराम भासले मला रायरीस ओढ ही तुझिया भेटीची आता गड अवघा हा पहा जणु नटला स्वागता लाख लाख जखमांनी अंग आज सजलं (सजलं) हुरहुरलं रूणझुणलं वाट पाहे शंभूराया मन एकलं हुरहुरलं ग बाई बावरल वाट पाहे शंभूराया मन एकलं मन एकलं मन एकलं