Notice: file_put_contents(): Write of 689 bytes failed with errno=28 No space left on device in /www/wwwroot/karaokeplus.ru/system/url_helper.php on line 265
Sudhir Phadke - Maj Sang Laxmana Jaoon Kuthe | Скачать MP3 бесплатно
Maj Sang Laxmana Jaoon Kuthe

Maj Sang Laxmana Jaoon Kuthe

Sudhir Phadke

Длительность: 12:40
Год: 1983
Скачать MP3

Текст песни

सितेन आपल्या डोहाळे रमाना सांगितले
रामाने हसून तिला सांगितल कि
सीते तुझ्या मी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करीन
पती पत्नीचा हा मनोहर संवाद झाला
त्येचा दुसरेच दिवशीची गोष्ट
भद्र नावाचा एका गुप्त चाराना रामाना येयून सांगितल कि
राजन सेतू बंधन आणि रावण वध या दोन दैविक रीत्यान बद्दल
सारी प्रजा आपल्याला धन्यावाध देती आहे परंतु
आणि या परंतु च्या पुढे जे काय होत ते काय हा सांगायला तो काय धजेना
रामानी  त्येला जेव्हा सांगितल कि सत्य असेल ते निर्भय पणे कथन कर
तेव्हा तो पुढे सांगू लागला
लोकांना एक कळत नाही कि
रावणाच्या घरी राहिलेली सीता
रामानी परत पत्नी मानलीच कशी
आणि तिच्या बरोबर प्रणय करण्या मधे
रामना कसला आनंद मिळतो
हे ही त्यांना काळत नाही
लोकपाल श्री रामचंद्रांच मन निघ श्न्य झाल
आपल्या प्राणांची शपत घालून त्यांनी लक्ष्मणाला अध्न्या केली
लक्ष्मणा जानकीला वाल्मिकी आश्रमात माझ्या सान्निध्यात सोडून ये
रामांची प्राणांची शपत उल्लंघण कोणालाच शक्य न्हवत
रथ तयार झाला जानकी रथा मध्ये बसली
आणि जस जसा रथ बन प्रदेशात येऊ लागला
तसा सीतेला अतिशय आनंद झाला
तिला वाटल कि आपले डोहाळेच पुरवले जात आहेत
आणि तिला आनंद मात्र लक्ष्मणाला सहन होईना
तो म्हणतोय कि वाहिनी हे अस नाही
आणि जे काही होत ते ऐकल्या नंतर मात्र
सीतेच्या दुखाला विश्व तीठ झाल
गद गद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें
पाहूं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्‍त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे
देंठ तुटे
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे
आज विटे
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

अग्‍नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
चरणेची धरेसी कंप सुटे
कंप सुटे
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें
मज सांग

प्राण तनुंतून उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती
बाहतसे मज श्रीभागीरथी
बाहतसे मज श्रीभागीरथी
अडखळें अंतिचा विपळ कुठें
विपळ कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

सरले जीवन सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
सरले जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हें, सुमन मिटें
सुमन मिटें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
सुखांत नांदो राजा रघुवर आ आ
जानकी जनांतुन आज उठे
आज उठे
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग

जाइ देवरा नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
जाइ देवरा नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव केवळ नृपती
पती न राघव केवळ नृपती
बोलतां पुन्हा ही जीभ थटे
जीभ थटे
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें

इथुन वंदिते मी मातांना
इथुन वंदिते मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना जातांना जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे
श्रीराम श्रीराम श्रीराम