Kelicha Sukale Baag
Usha Mangeshkar
3:22सूर सनईत नादावला सूर सनईत नादावला पूर नयनांत या दाटला सांग विसरू कशी मी तुला सूर सनईत नादावला पुण्यवंतापरी या घरी जन्मले सात जन्मांतले भाग्य जे लाभले सात या पाउली विस्मरू मी कशी मूर्त आई तुझी वत्सला सूर सनईत नादावला सान होते कशी मूक वेडी कळी अमृताने तुझ्या वाढले मी खुळी रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना गंध विसरेल का गे फुला सूर सनईत नादावला पूस डोळे नको हुंदके आंसवे चालले गे जरी मी पतीच्यासवे माउली तू मला साउली जीवनी मी तुझी लाडकी प्रेमला सूर सनईत नादावला पूर नयनांत या दाटला सांग विसरू कशी मी तुला सूर सनईत नादावला