Man Talyat Malyat
Shailesh Ranade
3:39दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणांत त्या सगळया बकुळ फुलांची त्या सगळया बकुळ फुलांची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे शुभ्रफुले वेचित रचिला चांद तू जुईचा म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळया भुईचा शुभ्रफुले वेचित रचिला चांद तू जुईचा म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळया भुईचा फुलातल्या त्या चंद्राची फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात गवतातून चालत होतो मोहूनी मनात भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात गवतातून चालत होतो मोहूनी मनात चुकलेल्या त्या वाटेची चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी या उदास आभाळाची या उदास आभाळाची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे शपथ तुला आहे शपथ तुला आहे