Mee Niranjantil Vaat

Mee Niranjantil Vaat

Gajanan Watve

Альбом: Mee Niranjatil Vaat
Длительность: 3:16
Год: 1983
Скачать MP3

Текст песни

मी निरांजनातील वात आ आ आ
मी निरांजनातील वात
माझ्या देवापाशी जळते हासत देवघरात
निरांजनातील वात आ आ आ
मी निरांजनातील वात

माझ्या प्रभूस माझी पारख
माझ्या देवाचे मज कौतुक
प्रभा प्रभूच्या सहवासाची फुलली या हृदयात आ आ
फुलली या हृदयात आ आ
निरांजनातील वात

प्रशांत नीरव या एकान्ती
शुचिर्भूतता सारी भंवती
पवित्र दर्शन सदा लोचना लाभतसे दिनरात आ आ
लाभतसे दिनरात आ आ
निरांजनातील वात

कणाकणांतून प्रभा उधळिता
पटे जिण्याची मज सार्थकता
पटे जिण्याची मज सार्थकता
उषा फुलविता भयाण रात्री भासे रवितेजात आ आ
भासे रवितेजात आ आ
निरांजनातील वात

तुमची करण्यासाठी सेवा
प्राणाहुती ही माझी देवा
प्रकाशपूजन माझे घ्या हे जे प्राणाप्राणांत आ आ
जे प्राणाप्राणांत आ आ
निरांजनातील वात आ आ आ
मी निरांजनातील वात