Bala Hovu Kashi Utarai
Lata Mangeshkar
3:20प्रेम तुझ्यावर करिते मी रे प्रेम तुझ्यावर करिते मी रे सांगितल्याविन ओळख तू रे सांगितल्याविन ओळख तू रे प्रेम तुझ्यावर करिते मी रे चंद्र झळकता तुझिया नयनी या डोळ्यांतील प्रीत-रोहिणी चंद्र झळकता तुझिया नयनी या डोळ्यांतील प्रीत-रोहिणी ओढुन किंचित निळी ओढणी ओढुन किंचित निळी ओढणी हासत खुदूखुदू, लाजत का रे? प्रेम तुझ्यावर करिते मी रे पल्लवतो बघ तनुलतिकेवर स्पर्श सुखाचा तो गुलमोहर पल्लवतो बघ तनुलतिकेवर स्पर्श सुखाचा तो गुलमोहर चैत्रप्रीतिच्या आम्रतरुवर चैत्रप्रीतिच्या आम्रतरुवर बोलत कुहूकुहू कोकिळ का रे? प्रेम तुझ्यावर करिते मी रे तुझ्या दिशेला वळता मोहून सूर्यफुलापरी फुलते यौवन तुझ्या दिशेला वळता मोहून सूर्यफुलापरी फुलते यौवन भ्रमर मनाचा हृदयी रंगुन भ्रमर मनाचा हृदयी रंगुन गुंजत हितगुज तुझेच का रे? प्रेम तुझ्यावर करिते मी रे सांगितल्याविन ओळख तू रे प्रेम तुझ्यावर करिते मी रे