Natarang Ubha
Ajay Atul
4:20Madhura Datar, Priyanka Barve, Vishwajeet Borvankar, Ajay - Atul, And Guru Thakur
अहो नर नारीचे मिलन घडता जीव नवा ये जन्माला हे हे अहो नर नारीचे मिलन घडता जीव नवा ये जन्माला तिन्ही त्रिकाळी सत्य असेहे ठाऊक अवघ्या जगताला जी जी जी जी अगं सांग तु ऐशा मिलनाविना जन्म कुणाचा झाला गं अन कुणा नारीनं कसा अन कधी चमत्कार हा केला गं जी जीर जी जी जीर जी जी जीर हे जी अहो नसे नारी ती ऐरी गैरी आदीशक्ती ह्या जगती गं आदीशक्ती ह्या जगती गं सांब शिवाची अर्धांगी तीज माय पार्वती म्हणती गं जी जी जी जी अहो अंग मळातून बालक रचिला चमत्कार तो गणपती अन त्याच गणाची आज थोरवी कार्यारंभी गाती गं हा जीर जी हा जीर जी हा जी जीर जीर जी सदैव असते सख्या संग जरी बिलगून त्याला राही गं अंधाराचं बोट धरूनी कुणा भेटण्या जाई गं अव देती दुनिया तरी दाखला या दोघांच्या पिर्तीचा या दोघांच्या पिर्तीचा अंधाराचं गुपित सांग तू सवाल करते नीतीचा जी जी जी जी सोबत असते तरी न दिसते गोष्ट ही न्याऱ्या ढंगाची अंघारी त्या विरुन जाते सखी सावळ्या रंगाची हे युगायुगांचे सत्य असे ही सखी सख्या विन नसते गं सखी सख्या विन नसते गं शरीर म्हणजे सखा तयाची सखी सावली असते गं हा जीर जी हा जी जीर जीर हा जी आभाळाहून विशाल भारी कधी लोण्याहुन मउसुत गं कधी लोण्याहुन मउसुत गं फिक्की पडती चंदनकाडी झिजनं त्याचं अद्भुत गं जी जी जी जी डोईवरली होई सावली कधी पाठीचा ताठ कना कधी पाठीचा ताठ कना कधी प्रसंगी तांडव करुनी होई भोळा सांब पुन्हा गं देवदानवांनाही होता प्रत्येकाला असतो गं नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो गं माझे राणी तू मैने तू नावी तू ग जी र जी र हे जी र जी र जी हे किती वर्णू गं महिमा त्याचा त्याच्या पायी घडले गं हरवून जाता त्याची सावली जगी एकटी पडले गं लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं पुन्हा कधी ना मिळतो गं उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं बाप कुणा ना कळतो गं जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे त्त्याच्या गुनांची छाप दिसे सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे आ जी र जी आ जी र जी जी र जी र हे जी र जी र हे जी र जी र हे जी