Maza Konkan Bhari (From "Gharat Ganpati")

Maza Konkan Bhari (From "Gharat Ganpati")

The Konkan Collective

Длительность: 2:45
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

माझ्या कोकणचो रुबाब भारी

कोकणचो रुबाब भारी
माझ्या कोकणचो, बाई, तोरो भारी
दिसते भारी गणपतीची स्वारी
अन आला धा दिस मा माझ्या घरी

मालवण, चिपळूण, सावंतवाडी
माझ्या कोकण गावांचो दिमाख भारी
दिसते भारी गणपतीची स्वारी
माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी

दमदमानं हाका गाडी
माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी
कारीनं येवा, बशीनं येवा
नायतर सुस्साट आगीनगाडी

मुंबई, पुण्याचे रस्ते सोडा
माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी

फणसाच्या कापा आंबापोळी
काजूची बर्फी, नारळ वडी
तललेली मांदेली पापलेट चिंबोरी
आजीच्या हाताला चव भारी

लाटांची सुरेल अदाकारी
टुमदार घराला देखणी वाडी
मौजेन राहूया, विरीत पोहुया
समुंदराची दौलत न्यारी

कोकणची भावांनो कराल वारी
गड्या, विसरून जाशील दुनिया सारी
गणपती रायाची आरती गायाला
जमली नातीगोती दारी

मुंबई, पुण्याचे रस्ते सोडा
माझ्या कोकणावाटे तुम्ही वलवा गाडी
मुंबई, पुण्याचे रस्ते सोडा
शपथ हाय तुमका वलवा गाडी